शेतमालाला भाव हवा
नको कर्जमाफी!
पुन्हा पुन्हा पैशे मागायला
नाही मी भिखारी..

कष्टाने पिकवावे रान
तरी झोळी माझी रिकामी
डोळ्यांतुन आणे कांदा पाणी
ढगं ठरली निकामी

तापलेल्या ऊन्हात नाही
नाही गर्जत्या तुफानात
हलाल होतो शेतकरी
भाव नसतांना बाजारात

डोळे लावून बसू नका
आता आल्या निवडणुका
जागे व्हा राज्यकर्त्यांनो
स्वामीनाथन आयोग हवा

राम मंदिराच्या आधी
अन्नदात्याची ऐका वाणी
शेतकरी राम राम बोलला तर
उरणार नाही कोणी!
-ऋत्वीक