जे माझे नव्हते कधीही, ते आता मिळणेही नाही
एकतर्फी ह्या प्रवासात माझ्या, गंतव्य आता येणे नाही

सांगून कुणाला कळणार नाही
वेदना अंतरी ज्या आहेत काही
सापडले जगाला अजून नाही
औषध अंतरीच्या व्रणावर काही

त्यांच्या आठवणीत आता, घ्यायचा मज विसावा नाही
एकतर्फी ह्या प्रवासात माझ्या, गंतव्य आता येणे नाही

आपले जे होणार नाही
आस त्याची का धरावी
ह्या वाटेला मिळणार नाही
फक्त उपहास सोडून काही

येऊनि जाते ठिकाण त्याचे, कधी जो वाट बदलून पाही
एकतर्फी ह्या प्रवासात माझ्या, गंतव्य आता येणे नाही

शोधल्या जरी दिशा दाही
शोधून प्रेम मिळणार नाही
अंधारात जर पाहणार काही
कधी सावली दिसणार नाही

येईल पुन्हा ह्या वाटेवरी मी, जरी कोणी भेटणार नाही
एकतर्फी ह्या प्रवासात माझ्या, गंतव्य आता येणे नाही
-ऋत्वीक