ज्याला माहितीच नाही की नेमकं पाहिजे काय,
अश्या एखाद्या व्यक्तीला तुम्ही द्याल तरी काय?

मागणारे लोकं मागतात, जोडून हात, धरून पाय,
पण ज्याला द्यायचेच नाही, तो देईल तरी काय?

जिथे सम्मान नाही, प्रेम नाही, फक्त पैसाच बाप-माय,
अशा ठिकाणी वेळ घालवून मिळवायचे तरी काय?

बहरलेला मोगरा उधळतोय दरवळ, पण वेळच नाय,
निसर्गाचं आलिंगन नाकारलं, मग देव देईल तरी काय?

वासरू असतो लांब आणि गोठ्यात असते गाय,
विसरू कसा तो त्याग, काढताना दुधावरची साय?
-ऋत्वीक