किंमत उरली नाही पाय माणसाले मातीची,
कवडीमोल गेली गा गोनी कांद्या टमाट्याची.
लेकरू रोज मागते घेऊन दप्तर शाळेसाठी,
उरलं नाही काहीच देऊन रोजी मजुरांची.
उसनवारी उरात, डोळा बायका पोरांचे हाल,
दिवसा भेव वाटते राजा नाही भीती रात्रीची.
शेतमालाले सोडून आहे सगळं महाग येथी,
परवडत नाही दोस्ता जिंदगी कास्तकाराची.
नावाचा बळीराजा खरा आहो मी भिखारी,
किराण्यापासून कृषी केंद्रात नोंद उधारीची.
ऊन वारा सोसून मी पेरलं बियाणं वावरांत,
यंदा पावसानं केली माती साऱ्या पिकाची.
सांग सोबत्या वाहून गेलं पुरात माझं सारं,
ह्या जन्मी तरी उघडल का झोप शासनाची.
-ऋत्वीक