क्षणात आपला होतो येथे पारखा सख्या रे,
झाला कधी हा सैतानाचा इलाखा सख्या रे.

SC, OBC नि OPEN सारखे भेद छप्पन्न,
का होत नाही माणूस एक सारखा सख्या रे.

मरणासन्न झाली संवेदना अन्यायाप्रति बघ,
दुखदर्शनी दुसऱ्यांच्या का बुरखा सख्या रे.

दिले संस्कार शिकवण सर्व त्यांनी भरपूर,
का असा एकाकी पडला पुरखा सख्या रे.

प्रेम, सम्मान, इमानदारी झाली सर्व पैशाची,
माणुसकीला माणसापासून धोखा सख्या रे.

गळाली सारी पाने बघ संवेदनेच्या वेलीची,
द्वेषाच्या झाडाला केवढ्या शाखा सख्या रे.
-ऋत्वीक

Comments are closed.