फक्त तिकीट राहून जाते…

प्रवास असतोच निराळा, रंगीत आठवणींनी भरलेला सारा, मित्र बनतात, धमाल होते, असतो तो काळ सदैव स्मरणारा, हे सगळं मनात साठवून, सावरून मौल्यवान क्षणांचा पसारा, सामान घेऊन परत येण्यात पार दमछाक होऊन जाते, सरते शेवटी काही प्रवासांमध्ये, फक्त तिकीट राहून जाते. प्रवास केला, दिसले मित्र, अत्यानंद गगनात मावेना सारा, जसा पावसाने तृप्त झालेल्या धरिणीच्या सुगंधाचा पसारा, […]